First time in Bhiwandi Multi Cuisine Restaurant – Celebration Family Restaurant
Meenakshi Shinde,Mayor of Thane inaugurated Meenakshi Shinde,Mayor of Thane inaugurated

First time in Bhiwandi Multi Cuisine Restaurant – Celebration Family Restaurant

आगरी-कोळी, मालवणी खाद्य पदार्थ

सात बेटांची राणी मुंबापुरी म्हणजे मुंबईची वैभवपूर्ण अशी खाद्यसंस्कृती आहे. मुंबईचे मूळ रहिवासी असलेला आगरी-कोळी समाज  मांसाहारीच. समुद्रातून पकडून आणलेली ताजी मच्छी(मासे) शिवाय आहार पूर्ण होत नाही. तसेच ‘जिथे जे पिकतं तिथे तेच शिजतं‘असं म्हणतात, समुद्र किनारा खाडी लगतच्या जमिनीत भात शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे आगरी-कोळी लोकांच्या आहारात तांदळाच्या भाकरीला फार महत्व आहे. अशा आगरी-कोळी पद्धतीचे अस्सल पदार्थ  तांदळाची भाकरी येथे तुम्हाला खायला मिळेल. आगरी-कोळी घराघरात वापरला जाणारा पारंपरिक मसाला वापरून पदार्थ सर्व्ह केले जातात. त्यामुळे खवय्यांना अस्सल चव चाखता येईल.

खास मालवणी मसाला, ओल्या नारळाचा वापर करून बनवलेले मालवणी पदार्थही आम्ही सर्व्ह करतो. लाल तवंग, झणझणीत, गरमागरम मालवणी, आगरी, कोळी कालवण किंवा मटणाचा रस्सा तोंडाला पाणी सुटला ना? मग वाट कसली पाहताय प्रत्यक्ष सेलेब्रेशन फॅमिली रेस्टोरंटमध्ये मित्र-परिवारासह या सेलेब्रेट करा, सेल्फी काढा, मनमोहक डीशेशचे पिक्स काढा, रुचकर असे पदार्थ खाऊन तृप्त व्हा… किंवा घरबसल्या आॅर्डर करा आमच्या अधिकृत संकेतस्थळावर  

Leave a Reply

Cart Item Removed. Undo
  • No products in the cart.
×

Cart